ईपीएस पेन्शन वाढीबाबत 'आप'ची पीएफ आयुक्तांशी बैठक



प्रेस मीडिया लाईव्ह :


कोल्हापूर :  ईपीएस पेन्शन वाढीबाबत 'आप'ची पीएफ आयुक्तांशी बैठक  त्यामुळे हा दाखला घरी जाऊन घ्यावा, पेन्शन धारकांना कार्यालयात येणे ऐवजी तालुका स्तरावर सुविधा केंद्र सुरु करून कागदपत्रांची पूर्तता करून घावी अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत आम आदमी पार्टी शिष्टमंडळाची अमित चौगुले क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त (II) यांच्याशी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

वरील मागण्याबाबत क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त (II) यांनी वाढीव पेन्शन ऑनलाईन फॉर्म काही दिवसात उपलब्ध होतील तसेच ईपीएस पेन्शन लाभार्थी कडून रक्कम भरू घेऊ नये याबाबत वरीष्ठ कार्यालयास कळविण्यात येईल असे सांगितले. तसेच इतर प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत पेन्शनधारकाच्या समस्या दूर करण्यासाठी तालुकास्तरावर दिनांक २७ जानेवारी पासून सुविधा कॅम्प सुरू करणार असलेचे सांगितले. या व्यतिरिक्त हयातीचे दाखले पोस्ट कार्यालयातील पोस्टमनकडून, https://jeevanpramaan.gov.in/ या वेब साईट वरून आप डाउनलोड करून हयातीचे दाखले देता येईल अशी व्यवस्था केली असलेचे सांगितले. सर्व मागण्यांबाबत आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी कार्यालयीन अधिकारी पी.आर.ओ. साळुंके हजर होते. 

या बैठकीचे आयोजन शहर संघटक संजय साळोखे यांनी केले. 

यावेळी पाश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, शहर सचिव अभिजीत कांबळे, समीर लतिफ, सचिन वणिरे, मयूर भोसले, संजय सासणे, दीपक चव्हाण, यदु कुलकर्णी, सुरेश पाटील, किरण खेबुडकर, आनंदराव वणिरे, रमाकांत अंग्रे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post