सावित्रीबाई फुले म्हणजे भारतीय स्त्रीवादाची जननी.. - श्री प्रसाद कुलकर्णी

 कन्या महाविद्यालयात 'स्वभान ते समाजभान' जागृत करणारी कार्यशाळा संपन्न... 

     


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी. ता.३ समाजाचा विटाळ सोसून शाळेची पायरी चढणाया सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीमती आक्काताई रामगोंडा  पाटील कन्या महाविद्यालयात महिला सक्षमीकरण व तक्रार  समिती, विवेक वाहिनी, आणि माजी  विद्यार्थिनी संघटना आणि समाजवादी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. भारतातील पहिल्या महिला शिक्षीका आणि कवयित्री असणाऱ्या  सावित्रीबाईंना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरीही त्यांनी मोठ्या धीराने शिक्षणाची गंगोत्री खेड्या पाड्यात  पोहचवली. त्यामुळे त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी म्हटले जाते असे ते म्हणाले.

     यावेळी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. विभावरी नकाते हिने स्व-भान ते समाजभान या विषयांवरती सर्व विद्यार्थिनींशी संवाद साधला. स्वर्गाचे दार उघडण्याचा म्हणजे  सुखाने जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण होय. एक साक्षर स्त्रीच सुसंस्कृत समाज घडवू शकते, त्यासाठी स्त्रीयांनी शिकले पाहीजे. त्यांच्या स्वत्वाची ओळख त्यांना झाली पाहीजे असे त्या म्हणाल्या.

          अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी सर्व विद्यार्थिनींना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ सार्या धनाहून । तिचा  साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन ...या  उक्तीप्रमाणे विद्या  ग्रहण केली पाहीजे. कारण 'शिक्षण' आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकते, असे त्या म्हणाल्या. 

       यावेळी सौ.सौदामिनी कुलकर्णी उपस्थित होत्या. सुत्रसंचालन प्रा. संगिता पाटील यांनी केले तर आभार प्रा. प्रमिला सुर्वे यांनी मानले.  या कार्यशाळेसाठी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक बंधू- भगिनी , प्रशासकीय सेवक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post