कोल्हापूरचे पालकमंत्री ना. दिपक केसरकर यांची श्री दत्त कारखान्यास सदिच्छा भेट

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/प्रतिनिधी:

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिपक केसरकर यांनी आज दुपारी श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर सदिच्छा भेट दिली. यावेळी कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 यावेळी ना. केसरकर यांनी श्री दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा योजनेची संपूर्ण माहिती घेतली. तसेच ऊस विकास योजनेअंतर्गत कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या विविध योजना तसेच उपक्रमांची माहिती घेतली. कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी सध्या कारखाना कार्यक्षेत्रात सात हजार एकरावर क्षारपड मुक्तीचे काम झाले असून साडे तीन हजार एकरावर प्रत्यक्ष उत्पादन घेणे सुरु झाले असल्याचे सांगितले. तसेच कारखान्याने सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान विकसित केले असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. या तंत्रज्ञानामुळे या भागातील शेतकरी शंभर टनांच्यावर उसाचे उत्पादन घेत असल्याची माहिती दिली.

यावेळी कारखान्याचे संचालक दरगु गावडे, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, इचलकरंजीचे नगरसेवक रवींद्र माने, अभिजित जगदाळे, दिपक गायकवाड (कुरुंदवाड), सागर धनवडे,धनाजी पाटील नरदेकर, नगरसेवक प्रकाश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post