साताऱ्यात भाजप-शिंदे गटाला चारली धूळ

 शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री शंभुराज देसाईंना पहिला धक्का 


प्रेस मीडिया लाईव्ह :

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता मतमोजणी सुरू आहे. निकालाचे पहिले कल हातात येत आहे. साताऱ्यातील कराडमध्ये धक्कादायक निकाल समोर आले आहे. शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री शंभुराज देसाईंना पहिला धक्का बसला आहे. सत्ता आली पण सरपंच राष्ट्रवादीचा झाला आहे. तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा पराभव झाला आहे. सातारा जिल्ह्यातील किवळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसने १२ पैकी १२ जागांवर विजय मिळवत भाजपा आणि शिंदे गटाला धुळ चारली आहे. तर, चरेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून १० जागांवर विजय मिळवला आहे.

तर विरोधी गटाला ३ जागांवर समाधान तर सरपंचपदी देवदत्त माने हे निवडुन आले आहेत. तर दुसरीकडे, कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल पहिला हाती आला आहे. यामध्ये पालकमंत्री शंभुराजे देसाई आणि अॅवोकेट उदयसिंह पाटील_ उंडाळकर यांच्या गटांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या असून सरपंच पदावर राष्ट्रवादी गटानं २ मतानं विजय मिळवला आहे.शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आहे.

तर, कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झालं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसला आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पॅनेलचा दणदणीत विजय मिळवला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post