महिनाभरापासून सुरु असलेल्या गावगाड्यावर आज गुलालाची उधळण होणार.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक :  गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या गावगाड्यावर आज गुलालाची उधळण होणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी आठपासून सुरु झाली आहे. सकाळी साडेआठच्या सुमारासच पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतमोजणीस्थळी कडक बंदोबस्त आहे. सीसीटीव्हीचीही नजर असणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्या-त्या तालुक्याचे तहसीलदार काम पाहतील. त्यांना एक सहायक अधिकारही असणार आहे.

या ठिकाणी होणार मतमोजणी

 • गगनबावडा : तहसील कार्यालय
 • राधागनरी : शासकीय गोदाम
 • भुदरगड - गारगोटी मौनीनगर तालुका क्रीडा संकुल
 • आजरा : तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
 • हातकणंगले : तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत
 • शिरोळ : तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
 • शाहूवाडी : तहसील कार्यालयातील जुने शासकीय धान्य गोदाम
 • पन्हाळा : नगरपालिका सभागृह
 • करवीर : बहुउद्देशीय हॉल रमण मळा कसबा बावडा
 • कागल : जवाहर नवोदय विद्यालय
 • गडहिंग्लज : नगरपरिषद पॅव्हिलियन हॉल
 • चंदगड : तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतकोल्हापूर 

 • शहराच्या वेशीवरील गावांमध्ये निवडणूक होत असल्याने उत्सुकता आहे. वडणगे, पाचगाव, उचगाव, कळंबा, मोरेवाडी या ग्रामपंचायतींमध्ये थेट महाडिकआणि सतेज पाटील  गटात स्पर्धा असल्याने कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पाचगावमध्ये 66 टक्के मतदान झाले. पाचगावमध्ये महाडिक आणि पाटील गटात थेट स्पर्धा आहे. अपक्षांनी सुद्धा मोठी ताकद लावली असल्याने डोकेदुखी कोणाला होणार हे निकालानंतर समजेल.

Post a Comment

Previous Post Next Post