जड वाहनांना बंदी , याचा फटका कचरा वाहतुकीला बसला

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांकडून दिवसा जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचा फटका कचरा वाहतुकीला बसला असून, शहरात अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचत आहेत.त्यामुळे हा कचरा रात्री उचलला जात असला तरी दिवसभर शहर अस्वच्छ दिसत असल्याने महानगरपालिका कचरा उचलते का नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

महानगरपालिकेकडून शहरातील उद्यानाच्या बाहेरील झाडांचा कचरा, फांद्या, पालापाचोळा तसेच शहरातील नारळांची शहाळी याचे संकलन करून त्याची वाहतूक करणे तसेच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी एका खासगी कंपनीस काम देण्यात आले आहे. या कंपनीकडून शहरातील हा कचरा उचलण्यासाठी शहरात 26 वाहने भाडेतत्वावर घेतली असून, त्या माध्यमातून हा कचरा दररोज उचलला जात होता. मात्र, पोलिसांनी शहरात दिवसा जड वाहनांना बंदी घातली आहे, तसेच ही वाहने दिवसा कचरा उचलण्यास आल्यानंतर पोलिसांकडून त्यांची अडवणूक केली जात असून, महापालिकेची परवानगी मागितली जात आहे. त्यामुळे महापालिकेने पोलिसांकडून परवानगी घेऊन द्यावी, अशी मागणी या ठेकेदाराने महापालिकेकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post