पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लाच प्रकरणात अडकलेल्या महापालिकेतील सहा कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द केले

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पठाण एम एस :


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लाच प्रकरणात अडकलेल्या महापालिकेतील सहा कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द केले आहे. निलंबन आढावा समितीच्या शिफारसीनुसार न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द केले. तसेच या कर्मचाऱ्यांना अकार्यकारी पदावर, जनसंपर्क येणार नाही अशा ठिकाणी पदस्थापना देण्यात आली.

वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना या कर्मचाऱ्यांना लाच लुचपत विभागाने 18 ऑगस्ट 2021 रोजी महापालिका मुख्यालयातच रंगेहाथ पकडले होते. मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, विजय चावरिया (लिपिक), राजेंद्र शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद कांबळे (शिपाई) यांना याप्रकरणी अटक झाली होती. काही दिवसांनंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. लाच प्रकरणात अटक झाल्यामुळे पिंगळे, चावरिया, शिंदे. कांबळे यांच्यासह लिपिक प्रदीप कोठावदे, हबैती मोरे यांना पालिका सेवेतून निलंबत केले होते. सुमारे 16 महिन्यांपासून ते निलंबत होते. त्यांची विभागीय चौकशी अद्यापही सुरुच आहे.

या निलंबित कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा आढावा घेण्यासाठी हे प्रकरण आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखालील निलंबन आढावा समिती समोर सादर करण्यात आले होते. या समितीत आयुक्तांबरोबरच नगरसचिव विभागाचे प्रमुख म्हणून प्रभारी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, कायदा विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांचा समावेश होता. या निलंबित कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी, त्यांच्याविरुद्धच्या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करुन त्यांना अकार्यकारी पदावर जनसंपर्क येणार नाही अशा ठिकाणी पुन:स्थापित करण्याची समितीने सर्वानुमते शिफारस केली. त्यानुसार पिंगळे (शिक्षण विभाग), चावरिया (आयटीआय मोरवाडी), शिंदे (क्रीडा

Post a Comment

Previous Post Next Post