8 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक : बहुजन महापुरुष सन्मान समिती

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पठाण एम एस :

पिंपरी : राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आदीसह अनेक महापुरुषांवर चुकीची वक्‍तव्ये केली जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्‍तव्ये केली आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देत असल्याचे बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने सांगण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना एकवटल्या असून 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देत या वक्‍तव्यांचा निषेध करणार असल्याचे समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगितले.

बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मनसेचे अध्यक्ष सचिन चिखले, माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, काशिनाथ नखाते, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष इम्रान शेख, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारूती भापकर, अभिमन्यू पवार, सतिश काळे, धम्मराज साळवे आदीसह सर्व पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
समितीच्या वतीने 8 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड शहर बंदची हाक दिली आहे. या निर्णयास शहरातील सर्व नागरिकांनी साथ द्यावी, शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, उद्योजक कामगार, कष्टकरी वर्गाला यामध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे नम्र आवाहन करण्यात आले.
समितीच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या –
1) राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची पदावरून हकालपट्टी करावी.
2) भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी.
3) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करून राज्यातील जनतेची माफी मागावी.

Post a Comment

Previous Post Next Post