चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा... डॉ. आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळाची मागणी..

 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झालेले निलंबनाची कारवाई रद्द करावी अशी मागणी करण्यात आली 


प्रेस मीडिया लाईव्ह :

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. दुपारी पावणेचारच्या सुमारास त्यांचे सोलापूरच्या विमानतळावर आगमन झाले. यावेळी विमानतळातून बाहेर पडताना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले पदाधिकारी निळ्या टोप्या घालून थांबले असता मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना थांबवत त्यांच्या हातातील निवेदने स्वीकारली. यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, सचिव केरू जाधव, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, अजित बनसोडे, पप्पू गायकवाड, शांतीकुमार नागटिळक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याने देशभरातील तमाम आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा तसेच इतर नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करावेत यासह मनोज गरबडे, धनंजय इतगज, विजय ओव्हाळ यांच्यावरील पिंपरी चिंचवड पुणे आयुक्तालयात दाखल केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घ्यावेत, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झालेले निलंबनाची कारवाई रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post