"तीन नायजेरीयन व्यक्तींना २७,६७, २५० /- रू. किंमतीच्या ६० ग्रॅम कोकेन व ७० ग्रॅम एम.डी पावडरसह गुन्हे शाखा, ठाणे शहर कडुन जेरबंद”



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी सुनील पाटील

दि.२४/१२/२०२२ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विकास घोडके, गुन्हे शाखा, घटक ५. वागळे, ठाणे यांना गुप्तबातमीदारा मार्फत कोरम मॉल जवळ, किटीकेअर हॉस्पीटल शेजारी, वागळे इस्टेट, ठाणे येथे रोडवर नायजेरीयन इसम कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करीता येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यावरून मा. वरिष्ठांच्या आदेश व मार्गदशना प्रमाणे सदर ठिकाणी सापळा रचुन तीन नायजेरीयन नागरीक नामे १) ओबासी उर्फ मॅगो युजीन स्टॅन्ली, वय ४५ वर्षे, रा. नालासोपारा, पालघर. २) प्रास्पर ओकरो वाचक, वय ४४ वर्षे, रा. मिरारोड, ठाणे. ३) संडे बोटेंग, वय २५ वर्षे, रा. मालाड, मुंबई यांना दि.२४/१२/२०२२ रोजी ०१.०५ वा. ताब्यात घेतले असुन त्यांचेकडुन ६० ग्रॅम वजनाचे कोकेन व ७० ग्रॅम वजनाची एम.डी पावडर असे अंमली पदार्थ, मोबाईल, नायजेरीया देशाचा पासपोर्ट व विजा इ. वस्तु मिळुन अं.कि. रू २७.६७,२५०/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी हे नायजेरीया देशाचे मुळ रहिवासी असून त्याने त्याचा आफिकन साथीदार याचेकडुन सदरचा कोकेन हा अंमली पदार्थ ठाणे येथे विक्री करणे करीता घेवुन आला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत वागळेइस्टेट पोलीस स्टेशन येथे गुरजि.नं. २९४/२०२२ कलम ८(क), २०(ब). २९ एन.डी.पी.एस. अधिनियमान्वये दाखल असून सदर गुन्हयाचा तपास स.पो. निरी/ भुषण शिंदे, गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे हे करीत आहेत.

ठाणे पोलीसांकडुन नववर्षस्वागत व नाताळ सुट्टयामधिल पाटयांचे अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबविण्यात येत आहे. नाताळ व नववर्ष आगमनाचे पार्टीमध्ये अंमली पदार्थ विक्री केली जाते अगर कसे? यावर पोलीसांची करडी नजर असनार आहे. सदरचा अंमली पदार्थ नववर्ष स्वागत व नाताळ सुट्टयामधिल पाटर्यांमध्ये विक्री करण्याकरीता आणला होता काय? याबाबत पोलीस तपास करीत आहेत. पोलीसांचे जनतेस आवाहन आहे की, अशा पाटर्यांमध्ये कोणी अमली पदार्थ विक्री करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याची माहिती त्वरीत पोलीसांना दयावी.

Post a Comment

Previous Post Next Post