कर्वेनगर युथ फोरम तर्फे पाच किलोमीटरची वाकेथॉन

 --पहाटेच्या थंडीमध्ये १३० नागरिकांचा सहभाग.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  ( प्रतिनिधी ) : 

कर्वेनगर मध्ये प्रथमच *'कर्वेनगर युथ फोरम तर्फे'* रविवार, दिनांक १३ नोव्हेंबर रोजी वाकेथॉन २०२२  *'Walkathon २०२२'* चे आयोजन करण्यात आले होते. एकूण १०२ कुटुंबातून १३० तरुण-तरुणी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांनी पहाटेच्या गुलाबी थंडीत ५ किलोमीटरचे अंतर चालून  वाकेथॉन चा संपूर्ण आनंद लुटला.  

सकाळी साडे सहा वाजता कर्वेनगरमधील 'वेदांत मंगलम'च्या मैदानावर सर्व नागरिक एकत्र जमल्यावर सहभागी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी संधी योग व हलक्या स्वरूपाचे व्यायाम केले. त्यानंतर सर्वांनी तीन-तीन जणांच्या गटाने गतिमान होऊन चालायला सुरुवात करून कर्वेनगर येथील 'वेदांत मंगलम ते म्हात्रे पूल' आणि म्हात्रे पूल ते वेदांत मंगलम परत जलद चालणे असा मार्ग अतिशय उत्साहात आणि सहजपणे एक तास व दहा मिनिटे या वेळेत चालून पूर्ण केला.  कर्वेनगर युथ फोरमने या वाकेथॉन मध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांसाठी प्रथमोपचार किट (First Aid kit), बिस्किटची व्यवस्था केली होती त्यामुळे नागरिकांना सुरक्षितपणे चालता आले. कर्वेनगरमधील या पहिल्या-वहिल्या वाकेथॉन मध्ये निवृत्त सैन्य अधिकारी,ज्येष्ठ नागरिक,शिक्षक,उद्योगपती, महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थिनींनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिशय उत्स्फूर्त पणे व उत्साहात सहभाग नोंदविला व कार्यक्रमाची शोभा वाढविली. यात महिलांचा सहभाग मोठया प्रमाणावर होता.

 'कर्वेनगर युथ फोरम'च्या माध्यमाद्वारे तरुण मंडळी एकत्र येत असल्याबद्दल या उपक्रमाचे कौतुक करून आणि अशा स्वरूपाचे उपक्रम नियमित व्हावेत अशी अपेक्षा वाकेथॉन मधील सहभागी नागरिकांनी व्यक्त केली. 

कर्वेनगर युथ फोरमचे सचिन आठवले, हेमंत सेलमोकर,अनय अष्टपुत्रे, जतिन तळेकर, प्रज्ञेश झंजाड, पूर्वा हिरन, अबोली साने, वर्षा चौधरी या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला व  विशेष परिश्रम घेऊन वॉकेथॉन - २०२२ पुर्णपणे यशस्वी केली.


अधिक माहितीसाठी

उमेश गानू

कर्वेनगर युथ फोरम

कर्वेनगर, पुणे

मोबाईल - ९९२२४ ०३४१२



कर्वेनगर युथ फोरम  द्वारा आयोजित वॉकेथॉन २०२२

क्षणचित्रे

Post a Comment

Previous Post Next Post