श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप,संचलित,”कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड) पेठ वडगांव”येथेबिरसा मुंडा’ यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयात 'भगवान बिरसा मुंडा' यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रेस मीडिया लाईव्ह :

पेठवडगाव : श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप,संचलित,”कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड) पेठ वडगांव”येथे  दिनांक 15/11/2022 रोजी’भगवान बिरसा मुंडा’ यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयात 'भगवान बिरसा मुंडा' यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

   या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'स्वातंत्र्य संग्रामातील जनजाती वीरांचे योगदान’ या विषयावर “वादविवाद स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने  प्राध्यापक सोरटे.एस.के यांनी 'भगवान बिरसा मुंडा’ यांची माहिती सांगितली.

   वाद विवाद या स्पर्धेसाठी दोन गट करण्यात आले .प्रत्येक गटांने आपापल्या परीने भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे व जीवन पटलाचे वर्णन केले.या स्पर्धेला सर्व सहभागी छात्राध्यापकांनी  उत्स्फूर्तपणे प्रतिसाद  दिला. या कार्यक्रमा साठी कॉलेजच्या प्राचार्य निर्मळे मॅडम प्रा. सोरटे, प्रा. शिरतोडे ,प्रा. मुजावर ,प्रा. जाधव उपस्थित होते.

  या कार्यक्रमासाठी कॉलेजच्या प्र.प्राचार्या सौ.आर.एल निर्मळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post