बिहार युपी प्रमाणे नवी मुंबईतही गुंडांच्या मालमत्तेवर बुलडोजर, विकी देशमुखच्या साम्राज्यावर हातोडा

 


प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

पनवेलच्या गव्हाण गावातील घराभोवती केलेले अतिक्रमण जमीन दोस्त करण्यास सुरवात. घरा आजूबाजूची  जागा बळकावून घेतली होती.  कोणाची हालचाल झाल्यास कळावे.यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने आजवर या अतिक्रमणाची तक्रार उघड झाली नव्हती.


अखेर तीन महिन्यांपूर्वी त्याला अटक केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांची नजर त्यांच्या या साम्राज्यावर पडली. त्यामुळे त्याने धमकावून बळकावलेली जागा मोकळी करण्यासाठी तिथले अतिक्रमण पाडण्यात यावे असे पत्र नवी मुंबई गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी बदलीपूर्वी दिले होते. त्याद्वारे गुरुवारी सकाळी सिडकोच्या पथकाने त्याठिकाणी हि कारवाई केली. थेट घराचे अतिक्रमण हटवून पोलिसांनी देशमुख याच्या साम्राज्याला सुरुंग लावला आहे

Post a Comment

Previous Post Next Post