शिरूर शहराचा गौरवशाली इतिहास नष्ट करण्याचा प्रकार, बहुजन मुक्ती पार्टीने केली तक्रार दाखल प्रेस मिडिया लाईव्ह

अन्वरअली शेख

 पुणे दि,१६ शिरूर शहर एक ऐतिहासिक परंपरा लाभलेला शहर आहे ,परंतु शिरूर शहराच्या गौरवशाली इतिहासाला नष्ट करण्याचा अपराध  शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ करत आहे.

 1914 पहिल्या महायुद्धात सहभागी झालेले शिरूर तालुक्यातील योद्धेंच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाची नासधूस करून शिरूर शहराचा चा महायुद्धात सहभागाचा गौरवशाली इतिहास नष्ट करण्याचा,घाणेरडा आणि घोर अपराध  शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाने केला  आहे, म्हणून दोषींवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शिरूरच्या जनतेची आहे,बहुजन मुक्ती पार्टीचे  शिरुर तालुकाअध्यक्ष  फिरोज भाई सय्यद आणि सहयोगी संघटनांच्या वतीने विद्याधाम प्रशालेच्या समोरील स्मारक बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त केलेच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी झालेल्या  शिरुर मधील योद्ध्यांच्या  स्मरणार्थ एक स्मारक उभारले होते. हे स्मारक विद्यमानस्थितीत  विद्याधाम प्रशालेच्या प्रांगणात होते.या ब्रिटिशकालीन स्मारकाची नासधूस शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाने केलेली आहे. तरी यांमधील सहभागी दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी यास्तव बहुजन मुक्ती पार्टी आणि समविचारी सहयोगी संघटना यांच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना आज दि. 11/11/2022 रोजी तक्रारी अर्ज देण्यात आला.

त्यावेळी भारतीय बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक मा. नाथाभाऊ पाचर्णे,बहुजन मुक्ती पार्टी शिरूर शहर अध्यक्ष मा. समाधान लोंढे,मा. अशोक भाऊ गुळादे आणि मनसेचे मा. संदीप जी कडेकर उपस्थित होते.

बहुजन मुक्ती पार्टीच्या तक्रारीनुसार मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, शिरूर यांनी पोलीस निरीक्षक शिरूर आणि मुख्याधिकारी शिनपा यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Post a Comment

Previous Post Next Post