विनायक मेटे अपघात प्रकरणाला नवं वळण

कार चालक एकनाथ कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे  यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता.त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु तिथे विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विनायक मेटे यांच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात येईल असं जाहीर केलं होतं. आता या प्रकरणाला नवं वळण आलंय.कार चालक एकनाथ कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस स्टेशन मध्ये चालका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच कार चालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post