खासदार संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसानंतर जामीन मंजूर

 


प्रेस मीडिया लाईव्ह ;

खासदार संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. ED ने कोर्टा विरोधात केलेलं अपीलही फेटाळण्यात आल्यामुळे संजय राऊत यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला.त्यांच्या सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. संजय राऊत यांच्या जामिना विरोधात हायकोर्टात आपील करायचं असल्यानं संजय राऊत यांच्या जामिनाच्या अंमलबजावणीला एका आठवड्याची स्थगिती द्यावी अशी मागणी ईडीच्या वतीनं करण्यात आली होती. 

या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र इडीची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली आहे. इडीची मागणी फेटाळण्यात आल्यानं संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. मात्र आम्हाला जामिनाविरोधात हायकोर्टात अपील करायचं आहे. त्यामुळे न्यायालयाने राऊत यांच्या जमीन मंजुरीच्या निर्णयाला एका आठवड्याची स्थगिती द्यावी अशी मागणी ईडीने केली होती. ईडीच्या या मागणीवर न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून लावत संजय राऊत यांना मोठा दिसाला दिला आहे.आज कोर्टामध्ये मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. प्रचंड गर्दी तरी टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी शांतता होती. सर्वाचंं लक्ष हे न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्या निकालाकडे लागलं होतं. तब्बल दीड तासांच्या प्रतिक्षेनंतर न्यायाधीश देशपांडे यांनी संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. 

ईडीकडून अटर्नी जनरल अनिल सिंह यांनी जोरदार युक्तिवाद करून राऊत यांचा जामीन अंमलबजावणी कालावधी पुढे ढकलण्याची मागणी केली. अपील करण्यासाठी कालावधी मागितला. अनिल देशमुख यांच्या प्रकरणाचा दाखला दिला. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे ईडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. ईडी या प्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post