तारदाळ गावचे सुपुत्र जवान निलेश खोत यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 भारतमाता की जय. वंदे मातरम च्या जयघोषात निलेशचा निरोप जनसमुदायान घेतला

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

तारदाळ गावचे सुपुत्र जवान निलेश अशोक खोत दिल्ली येथे देशसेवा बजावत असताना त्याचा आकस्मिक मृत्यू झाला शुक्रवारी सकाळी 9 वाजता तारदाळ मध्ये पार्थिव येताच त्याच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने ग्रामास्थ उपस्थित होते .खोत मळा येथे जवान निलेश खोत यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी तारदाळ व पंचक्रोशीतील हजारो संख्येने नागरिक अंत्यविधीसाठी उपस्थित होते    आज सकाळी सन्मती विधालय तारदाळ येथून जवान निलेश खोत यांच्या अंत्ययात्रा सुरू होऊन छ.शिवाजी चौक, तारदाळ ग्रामपंचायत, गावभाग, विठ्ठल मंदिर, चांदणी चौक, समर्थ नगर ते खोत मळ्यापर्यंत निघालेल्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने तारदाळ  व पंचक्रोशीतील सर्व राजकीय . सामाजिक , शैक्षणिक, तरुण मंडळे, महिला बचतगट, ग्रामस्थ उपस्थित होते तसेच तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय पाटील, सैनिक फेडरेशन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय माने, सैनिक कल्याण कार्यालय मंडळाचे अध्यक्ष संतोष पोवार, शंकर पाटील, रेजिमेंटमधील जवान सैनिक कल्याण अधिकारी अशोक पोवार, मराठा लाईफ इन्फटरी बेळगाव, राजेंद्र देसाई, मराठा लाईफ रेजिमेंट दिनकर घाटगे, नायक सुभेदार शेख, धोंडीराम पाटील, अभिजित महाजन, रणजित जाधव, रुपाली जुगळे तसेच माजी खासदार. राजु शेट्टी, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे , पी. एम. पाटील, शहापूर पोलीस. नि.अभिजीत पाटील, जि.प.सदस्य प्रसाद खोबरे प.स.सदस्या अंजना शिंदे, सरपंच यशवंत वाणी, विस्तार अधिकारी संतोष पवार, ग्रामसेवक बी.डी. कापसे तसेच शासकीय अधिकारी  उपस्थित होते जवान निलेश यांचे अंत्यदर्शन घेताना मुलगी श्राव्या व पत्नीने तसेच नातेवाईकांनी एकच टाहो फोडला त्यामुळे उपस्थित जनसमुदायालाही अश्रू अनावर झाले.

Post a Comment

Previous Post Next Post