आराटीओ श्री मैत्रेवार यांना निवेदनद्वारे गब्बर एक्शन संघटनेची मांगणी ॲटो रिक्षा तपासणी मोहिम व मिटर कॅलीब्रेशन ला मुदत वाढ देण्यात यावीप्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद (अब्दुल कय्यूम  ) : 

औरंगाबाद शहरी आरटीओ विभागा मार्फत आॕटो रिक्षाची कडक तपासणी करण्यात येत आहे.कागदपत्रे,मिटर तपासणी,रिक्षा बारकोड सक्ती करण्या करीता तपासणी मोहिम चालू आहे.

आज गब्बर एक्शन संघटने तर्फे आरटीओ संजय मैत्रेवार यांना एका निवेदन देऊन मांगणी केली आहे की, अॅटोरिक्षा तपासणी व मिटर कॅलिब्रेशन तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे,पुन्हा 1 तारखेनंतर  सुरु करण्यात येणार आहे. तरी वास्तविकता पाहता, शहरातील अँटो रिक्षांची संख्या लक्षात घेता अवघ्या महिण्याभरात अॅटो रिक्षा फिटनेस तपासणी जसे इन्शुरन्स, पियुसी, मिटर कॅलिब्रेशन व फिटनेस तपासणीला अनुसरुन इतर सर्व कामे करणे रिक्षाचालकाला शक्य नाही. तसेच आपण दिलेली मुदत तारखेला संपत असून पुढे 2 ते 3 महिने मुदतवाढ दिली तर या कालावधीत रिक्षाचालकांचे समुपदेशन करुन आम्ही सर्व रिक्षांचे फिटनेस तपासणी व तसेच मिटर कॅलिब्रेशन करुन घेण्यासाठी सर्व युनियनची मिटींग घेवून आवाहन करु व युनियनवाल्यांनी 1 तारखेपासून पुकारलेले बंद हे मागे घेण्यास भाग पाडु. तरीही आमच्या मागणीची दखल घेवून शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुरळीत चालू राहावी याकरीता रिक्षा तपासणी मोहिमेला मुदतवाढ देवून सहकार्य करावे,

यावेळी गब्बर एक्शन संघटनेचे संस्थापाक अध्यक्ष मकसुद अन्सारी,अध्यक्ष हफीज अली उपाध्यक्ष,शेख हानिफ (बब्बुभाई)मा. नगरसेवक छावणी,विलास मगरे सोशल मिडीया अध्यक्ष,रशिद महेबुब सलाहकार,सय्यद साबेर भाई सल्लागार,हसन शहा,जिल्हाध्यक्ष,ईस्माईल राजा शहर अध्यक्ष,सलमान पटेल पश्चिम अध्यक्ष,तय्यब जफर प्रवक्ता,अब्दुल कय्युम,हाफीज समद बागवान जिल्हा उपाध्यक्ष,फेरोज खान, अखिल पटेल,सय्यद ईस्माइल, अख्तर पटेल,सय्यद उजैफ आदींचे निवेदनवर सह्या आहे.

Post a Comment

Previous Post Next Post