सा.औरंगाबाद युवाचा वर्धापनदिन व पुरस्कार सोहळा दिमाखात साजरा...

 मुशायराने उपस्थितांची मने जिंकली, चार्लि चापलिने केले मनोरंजन


प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद : (प्रतिनिधी) : 

मागिल १७ वर्षांपासून न चुकता प्रकाशित होणारे व मराठवाड्यातील वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे साप्ताहिक औरंगाबाद युवाचा वर्धापनदिन दिमाखदार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकारीता, शिक्षण व सामाजिक, कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कारणा-या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. 

यावेळी मुशायरात प्रसिद्ध शायरांनी उपस्तितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जेष्ठ नेते इब्राहिम पठाण उपस्थित होते. मुगळीकर यांनी शुभेच्छा देण्यासाठी आपल्या भाषणात सांगितले मी या वृत्तपत्राच्या सुरुवातीपासून जोडलेले आहे. अब्दुल कय्यूम यांनी आपल्या बातमीतून खरे वास्तव निष्पक्षपणे वाचकांसमोर मांडण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. हे वृत्तपत्र दैनिक व्हावे अशी सदीच्छा त्यांनी व्यक्त करत सा.औरंगाबाद युवा टिमला शुभेच्छा दिल्या. यावेळी ईब्राहिम पठाण,शारेख नक्षबंदी तसेच सय्यद साबेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहेसंपादक अब्दुल कय्यूम यांचे शहरातील मान्यवर व वाचकांनी भव्य सत्कार करुन शुभेच्छांचा वर्षाव केला. 


कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दैनिक एशिया एक्स्प्रेसचे संपादक शारेक नक्शबंदी, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मोहम्मद हिश्याम उस्मानी, भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष सय्यद साबेर, गब्बर एक्शन कमेटीचे अध्यक्ष मकसूद अन्सारी, कचरु पाटील वेळंजकर, चित्रपट दिग्दर्शक अनिलकुमार शिंपी, डॉ.शेख शाहेद, पत्रकार परवेज खान, समाजसेवक मुख्तार खान उर्फ बब्बू भाई, डॉ.शकील शेख, पोस्टमास्टर सुरेश बनसोडे, सय्यद हमिद, साजिद मौलाना, मा.नगरसेवक अनवर बेग, शेख हनिफ आदींची मंचावर उपस्थिती होती. याप्रसंगी जालना येथील नीट परीक्षेत प्राविण्य मिळवलेली शिफा फिरदौस युसुफोद्दीन हिचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सय्यद साबेर,मकसूद अन्सारी,प्रवीण बुरांडे,मुख्तार खान (बब्बू भाई ) हफिज अली, अलीम बेग, शेख मुख्तार,संजय हिंगोलीकर,शकील अहेमद शेख,हसन शहा,जावेद खान,साजिद पटेल,शेख अब्दुल मुजाहेद,शेख असिम,शेख अय्युब,अशरफ खान,अकिल रामपुरे डॉ. शकील शेख हमीदोद्दीन शेख,असद खान,शेख सलीम,फोटोग्राफर अनिस रामपुरे,उप संपादक सय्यद करीम,मुसा खान,अकील अहेमद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी मेहनत घेतली आहे. सुत्रसंचालन शेख मुख्तार यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post