श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रथम वर्ष प्रवेश विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/प्रतिनिधी:

श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रथम वर्ष प्रवेश विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ (वेलकम फंक्शन) पार पडला. या कार्यक्रमास दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील (दादा) व प्रमुख वक्ते प्राध्यापक उदय मोरे (राजाराम सहकारी साखर कारखान्याचे सेक्रेटरी),प्राध्यापक मोहन पाटील- कार्यकारी संपादक इंद्रधनुष्य मासिक, मयूरभाई शहा हे उपस्थित होते.

  उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मुलांनी पुढील काळात संशोधन वृत्ती बाळगावी ज्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल. येथून पुढील काळात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी लागणार आहे. यासाठी नवनवीन कल्पनेने तयार झालेल्या साधनांचा उपयोग करणे सोपे होईल. यासाठी आपल्या नवनवीन संकल्पना राबवून नवीन मशनरीचा शोध लावावा, यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करावा, असे आवाहन गणपतराव पाटील यांनी केले.

वेलकम फंक्शन बरोबरच इंडक्शन प्रोग्रामही राबवला गेला. यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये प्राध्यापक उदय मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा व छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आपल्या भाषण कौशल्यातून विद्यार्थ्यांसमोर मांडला. तो मांडत असताना अनेक मोहिमा कशाप्रकारे यशस्वी केल्या याची माहिती दिली व छत्रपती शिवरायांचे स्थापत्यशास्त्राचा असणारा अभ्यास,  सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जागेची पाहणी कशाप्रकारे केली व त्याची उभारणी कशी केली या प्रकारचं स्थापत्य कलेचे ज्ञान या विद्यार्थ्यांसमोर आपल्या भाषणातून मांडले. समुद्रामध्ये आरमार उभे करत असताना महाराजांनी जी गलबते उभी केली ती डगमगली नाही पाहिजेत याचाही अभ्यास करून ती गलबते उभा केली. यामुळे अनेक लढाया जिंकता आल्या. अनेक स्वराज्य उभारणी मधला इतिहास त्यांनी सांगितला. 

  या कार्यक्रमासाठी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड ट्रस्टचे डायरेक्टर ए. एम. नानिवडेकर, प्राचार्य पी. आर. पाटील, उप प्राचार्य एन. बी. भोळे आदी उपस्थित होते. पी. बी. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार डी. व्ही. सुतार यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post