संतोष सातू( (कांबळे ) आठवले यांनी मागितली शासनाकडे इच्छा मरणाची परवानगी

 अन्यथा शासनाच्या विविध स्तरावर आंदोलनात भूमिका घेऊन इच्छा मरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जाईल...संतोष एस आठवले.

प्रेस मीडिया लाईव्ह 

नवे दानवाड , जूने दानवाङ ता . शिरोळ येथे गेली 46 वर्ष झाली गावात बेकायदेशीर विषारी हातभट्टी दारु उत्पादन व विक्रीचा  तसेच कल्याण मुंबई मटका व्यवसाय स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रीयतेचा फायदा घेऊन खूले आम सूरु आहे . 

एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठवला तर संबंधित स्थानिक पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग जूजबी कारवाई करते आणि सोडून देते या अति विषारी गावठी हातभट्टी दारूच्या व्यसनामुळे अनेक तरुण मृत्युमुखी पडले आहेत तसेच गावातील मटका व्यवसायामुळे अनेकांचे संसाराची राख रांगोळी झाली आहे काल परवाच सचिन सांगलीकर या रामोशी समाजातील तरुणांनी हातभट्टीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर खोटी ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी दाखवून त्याच्याकडूनच माफीनामा मागितला आहे त्यामुळे गावातील इतर लोक तक्रार करण्यास घाबरत असल्याने एक प्रकारची दहशत या गावांमध्ये हातभट्टीधारक व मटका बुकीवाल्यांची यांची झाली आहे सर्व गावठी हातभट्टी उत्पादन , विक्री करणारे व मटका बुकीधारक हे अनुसूचित जाती महार समाजातील आहेत आणि हे बेकायदेशीर धंदेवाले ॲट्रॉसिटी चा गैरवापर करून इतर लोकांच्यावर दहशत निर्माण करत आहेत त्यामुळे गावात इथून पुढच्या काळामध्ये 12 ,13 वर्षाचे तरुण हातभट्टी विषारी दारूच्या व्यसनामुळे मृत्यूमुखी पडणार आहेत व अनेक लोकांच्या संसाराची राख रांगोळी होणार आहे त्यामुळे मी संतोष सातू( (कांबळे ) आठवले आपल्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून इच्छा मारण्याची परवानगी मागत आहे आणि ती मला मिळावी ही विनंती अन्यथा शासनाच्या विविध स्तरावर आंदोलनात भूमिका घेऊन इच्छा मरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जाईल

संतोष एस आठवले

मु . पो .नवे दानवाड ता . शिरोळ जि. कोल्हापूर

Email- sangharshnayak24@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post