आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत शिरोळ तालुक्यातील शिवसेनेचा मोठा गट मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे गोटात दाखल

 वर्षा निवासस्थानी शिवसैनिकांचा सन्मान..


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई-माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत शिरोळ तालुक्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला समर्थन जाहीर करताना या पक्षात जाहीर प्रवेश केला,

यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या सर्व शिवसैनिकांचे स्वागत केले खासदार संजय मंडलिक व संजय पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित होते,

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने पाठिंबा व्यक्त केलेल्या या कार्यकर्त्यां मध्ये माजी शिरोळ तालुका प्रमुख सतीश मलमे, उदय झुटाळ, रतन पडियार, जुगल गावडे, सुरज भोसले, संभाजी गोते, अशोक शिंगाडे, सचिन डोंगरे व दादासो नाईक शिरोळ तालुक्यातील हे सर्व शिवसैनिक उपस्थित होते,मागील अनेक वर्षे या कार्यकर्त्यांनी शिवसेना या पक्षासाठी अहोरात्र केलेल्या कामाची दखल यावेळी मुख्यमंत्र्यांकडून  घेतली गेली, मागील अडीच वर्ष आपण माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात सक्रिय राहून काम केले आहे, या पुढच्या काळात आपण बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष तळागाळात पोहचवण्यासाठी ताकतीने काम करत राहू असे सतीश मलमे यांनी यावेळी सांगितले,

Post a Comment

Previous Post Next Post