आरोग्य हक्क समिती व चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी अखेर उपोषणा पासुन परावृत्त

आमदार राजेश पाटील  यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.


प्रेस मीडिया लाईव्ह :

आरोग्य हक्क समितीचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष मा.श्री.दत्ता मांजरे (तारदाळकर)यांच्या सूचनेनुसार आरोग्य हक्क समितीचे पदाधिकारी व चंदगड , गडहिंग्लज तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने हेरे सरमंजामच्या प्रश्ना बाबत गेले दोन दिवस उपोषणाला बसलेले होते. 


याबाबत आरोग्य हक्क समितीच्या पदाधिकारी व चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी यांची  आमदार राजेश पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना प्रश्ना बाबत आश्वासित केले आणि  19 तारखेला मा.जिल्हाधिकारी  राहुल रेखावत साहेब यांच्या उपस्थितीत बैठक लावून सदर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले  व उपोषण मागे घेण्यास विनंती केली.

यावेळी आरोग्य हक्क समितीचे चंदगड तालुका अध्यक्ष नारायण हुपरीकर, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष शशिकांत परीट तसेच समितीचे पदाधिकारी व मनोहर कुट्रे, देवानंद सुतार, अरुण कुट्रे , गंगाधर कापसे, रवी कापसे व तालुक्यातील शेतकरी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होतेPost a Comment

Previous Post Next Post