इचलकरंजीत महिला काँग्रेसच्या वतीने नारी शक्ती सन्मान कार्यक्रम उत्साहात

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी :

इचलकरंजी शहर महिला काॅंग्रेस कमिटीच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा , बक्षीस वितरण व नारी शक्ती सन्मान असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती .

.

इचलकरंजी शहर महिला काॅंग्रेसच्या वतीने जनतेच्या मुलभूत समस्यांवर आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो.विशेषत: महिला वर्गाचे प्रश्न सोडवणे ,त्यांच्या हक्काबरोबरच सबलीकरण व सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे , शासकीय योजना सर्व स्तरापर्यंत पोहचवून त्याचा लाभ मिळवून देणे यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.नुकताच शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून काॅंग्रेस कमिटीत रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धतील यशस्वी स्पर्धकांना विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यशस्वी महिलांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन नारी शक्तीच्या कार्याला सलाम करण्यात आला.या सत्कारमूर्तींमध्ये कौशल्या रेळेकर ,श्रीमती सरला चिन्नी ,राजश्री घोटणे ,संजीवनी सुतार ,सरिता सुतार, इंदुबाई बडवे ,भागीरथी आमणे ,सुरेखा खोत ,सोनल तांबे यांचा समावेश होता.हा कार्यक्रम सरोजनी खंजिरे महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा वर्षा खंजिरे ,

इचलकरंजी शहर  महिला काँग्रेस च्या अध्यक्षा ,माजी नगरसेविका मिना बेडगे ,सविता खुडे ,संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे माजी अध्यक्ष राहुल खंजिरे ,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद खुडे ,विद्या भोपळे ,वेदिका कळंञे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिस्मिल्ला गैबान ,मधु म्हेतर ,अनिता बिडकर , सावित्री हजारे ,सेवा दल काॅंग्रेसचे अध्यक्ष प्रमोद नेजे , अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष समीर शिरगांवे , इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष युवराज शिंगाडे , भटक्या विमुक्त सेलचे अध्यक्ष रवी वासुदेव , ओंकार आवळकर ,  संग्राम घुले ,राजू काटकर , दिलीप पाटील , दिलीप भोई ,तोसिफ लाटकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेसाठी महेश कला ॲन्ड आर्टचे प्रमुख महेश निंबाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी स्पर्धक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post