उमेद फौंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उमेद शिष्यवृती वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

दत्तवाड :  समाजात धार्मिक कार्यासाठी देणगीदार भेटतात मात्र   शिक्षणासाठी दान करणार्याची संख्या अत्यल्प आहे.उमेद फौन्डेशनने दानशुर व्यक्तीकडून देणगी मिळवून ते शैक्षणिक कार्यासाठी शिष्यवृत्ती म्हणून देतात हे कौतुकास्पद बाब आहे.असे मत दतवाड येथे शिरोळ तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम वितरणवेळी दत्तवाड केंद्रीय शाळेचे केंद्रमुख्याध्यापक राजू जुगळे यांनी व्यक्त केले. शिरोळ तालुक्यातील डॉ. बाबगोंडा देवगोंडा पाटील कृषी तंत्रनिकेतन, दत्तवाड ता. शिरोळ या महाविद्यालयात रविंद्र घरबुडे,सुयश अलगुरे,प्रज्वल निर्मळ, वैभव पाटील,विरेंद्र कारंडे व ओंकार कुंभार या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष रमेशकुमार मिठारे,

 महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष- रविकुमार पाटील, प्राचार्य एस.डी.लाड यांनी मनोगत व्यक्त केले.

            उमेद फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गाताडे सर यांच्या मार्गदर्शनाने आजचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.आजच्या कार्यक्रमाचे स्वागत उमेद फौंडेशनचे शिष्यवृत्ती प्रमुख -विक्रम म्हांळुंगेकर, प्रास्ताविक- उमेदियन,विजय केरबा , सुत्रसंचलन-संदिप पाटील, -उमेदियन प्रितम गवंडी यांनी आभार मानले.या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे, जिल्हा संघटक प्रकाश खोत, स्मार्ट चॅम्प स्कुल सैनिक टाकळी चेअरमन-विजयकुमार गवंडी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शिरोळ-अध्यक्ष संतोष जुगळे व डॉ.बाबगोंडा देवगोंडा पाटील कृषी तंत्रनिकेतन दत्तवाड महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post