वृध्द महिलेस चाकुचा धाक दाखवुन मारहाण व जबरी चोरी केलेल्या कुख्यात आरोपीस गुन्हे शाखेकडुन अटक.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

औरंगाबाद -पोलीस ठाणे वाळुज हद्दीमध्ये तुर्काबाद जिकठाण रोडवरील शिवारात दिनांक 03 10 2022 राजी 1५. 06 ते 18.30 वाजे दरम्यान एका वृध्द महिलेस अज्ञात इसमाने चाकुचा धाक दाखवून हाता चापटाने मारहाण करून तिचेकडील रोख रक्कम 2600/- रुपये सोन्याचे मनी मंगळसुत्र कानातले कुडके असे बळजबरीने काढून घेऊन पळुन गेल्याची घटना घडली होती.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता सर यांनी घटनेतील आरोपो यास सुर्योदयापुर्वी पकडण्याचे आदेश गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तसेच पोलीस ठाणे वाळूज पोलीसांना दिले होत तसेच गुन्हा घडलेपासुन प्रत्येक तासाला मा. पोलीस आयुक्त नेमलेल्या पथकातील पोलीसांकरवी माहिती घेत होते.

त्याअनुषंगाने गुन्हे शाखेने गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढली असता सदर आरोपी हा आंतरजिल्हा गुन्हेगार असुन त्याचेवर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्याची माहिती मिळाली. गुन्हेगार हा कुख्यात असल्याने तो एकदा पोलीसांना हुलकावणी देण्यात यशस्वी झाल्यास मिळुन येण्याची शक्यता कमी होती म्हणुन मा.पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता सो, मा. पोलीस उप आयुक्त मुख्यालय श्रीमती अपर्णा गिते यांचे मार्गदर्शनाखालो पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी या आरोपीताला पकडणे साठी 'बारकाईने नियोजन करीत अधिकारों व अंमलदार यांच्या छोटया टिम तयार केल्या व सरकारी वाहन न वापरता खाजगी वाहने व मोटरसायकल यांचा वापर करुन स्थानिक जनतेची व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी पर्यंत पोहचायचे असे ठरले.

दरम्यान पो. ठाणे वाळुज पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी याचवेळी त्यांचे पोलीस ठाणे व लगत औरंगाबाद ग्रामीण हद्दतील गुन्हेगारी वस्तीवर छापे मारुन संशयीतांना पकडण्याची मोहिम राबविण्याचे ठरले व तात्काळ रात्रभर मोहिम राबविली.

सदर घटनेतील आरोपी हा कुख्यात असुन तो जर पळुन गेला तर इतर राज्यात किंवा जिल्हयात जाण्याचो शक्यता आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार खाजगी वाहन मोटरसायकलसह तसेच स्थानिक नागरिकांची मदत घेत. बातमीदारांचे जाळे पेरत 5 ठिकाणी रात्रभर गुन्हेगारांच्या वस्तीवर छापे मारुन आरोपो बाबत माहिती काढली, आरोपी हा पहाटे त्याच्या कुटंबियासोबत मोटरसायकलवर पळुन जाणार आहे अशी माहितो पथकातील पोअं/ 2510 लखन गायकवाड, पोअं/ 2292 सुरेश भिसे यांना मिळाली त्यावरुन त्यांनी नेमलेल्या सापळया व्यतिरिक्त आरोपीचा माग काढुन 10 कि.मी. अंतर पाटलाग केला आरोपीस पोलीस पाठलाग करोत असल्याचे लक्षात आल्याने त्याने मोटरसायकल रस्त्याच्या कडेला झुडपात टाकली व पाठलाग करीत असलेल्या पोलीसांना चाकु बाहेर काढुन धाक दाखविला परंतु वरील दोन्ही अंमलदार यांनी अत्यंत शिताफोने योग्य बळाचा वापर करुन त्यास पकडले त्यानंतर त्यांनी तात्काळ पोउपनि अजित दगडखैर व सोबत अंमलदार तसेच टराविक अंतरावर पोउपनि अमोल म्हस्के व सोबत 3 अंमलदार यांना तात्काळ तेथे बोलावुन घेतले तेव्हा सदर इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव शक्तूर लक्ष्करी भोसले, वय 25 वर्षे रा गाजगाव ता गंगापुर जि. औरंगाबाद असे असल्याचे सांगितले.

त्यास घडलेल्या घटनेबाबत विचारपुस करता त्याने सुरवातीला उडवाउडवीचे उत्तरे देऊन खरे सांगण्याचे टाळले त्यास अधिक विश्वासात घेता त्याने एका वृध्द महिलेस जिकठाण ता गंगापुर जि औरंगाबाद शिवारातोल चाकूचा धाक दाखवुन चापट बुक्याने मारहाण करुन बळजबरीने तिचे गळयातील सोन्याचे मनो मंगळसुत्र व कानातील सोन्याचे कुडके काढुन तिचेजवळील रोख रक्कम घेऊन तेथुन मोटरसायकलवरुन निघुन गेलो अशो हकीगत सांगितली. त्याचेकडुन चोरलेली रोख रक्कम, मोटरसायकल, दोन चाकु इत्यादी असे एकुण 23,700 - रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला तो पंचांसमक्ष सविस्तर पंचनामा करुन जप्त करण्यात आला. सदर घटने बायत पो. ठायीणे वाळूज येथे पो.ठाणे वाळूज, गुरनं 308/2022 कलम 394 376(2)(M).323,504,506 भादवि सह गुन्हा दाखल.

कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील असुन मुद्देमाल व आरोपी यास पुढील योग्य त्या कायदेशीर कारवाई कामी पो टाणे बाळूज यांचे स्वाधीन करून गुन्हे शाखेने गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ उघडकीस आणला आहे आरोपी शक्तूर लक्षरी भोसले याचे विरुध्द

दाखल गुन्हयांची माहिती खालील प्रमाणे..

पो. ठाणे अ.क्र. कलम गुरनं 138/2014 182/2015 110/2018 99/2020 114/2020 395,394,452,461 भादवि 395,394,459,120 (ब) भादवि 427, 294, 504, 506, 34 भादवि 243/2020 सिल्लेगाव, औरंगाबाद ग्रा. 55/2021 399,402 भादवि सह कलम 4 व 25 भा.ह.का. सदरची कार्मागरी मा. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता सर मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ श्रीमती उज्वला वनकर, मा. पोलीस उप आयुक्त, मुख्यालय श्रीमती अपर्णा गिते, मा. सहायक पोलीस छावणी विभाग श्री. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अविनाश पोलीस उप निरीक्षक अजित दगडखैर, पोलीस उप निरीक्षक अमोल म्हस्के, पोना / 1636 संजय नंद पोना संदीप तायडे, पो अं/ 2588 अजय दहिवाळ, पोअं / 2545 नितीन देशमुख, पोअं/ 2510 धर्मराज गायकवाडपोअं/ 2292 सुरेश भिसे, पोअं/ 1292 अजय चौधरी, पोअं/ 2297 राजाराम डाखुरे, पोअं/ 2356 दादासाहेब व पोलीस ठाणे वाळुजचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन इंगोले यांच्या अधिकारी व अंमलदारांच्या टिमने । 2 3 4 5 6 7 सिल्लेगाव, औरंगाबाद ग्रा. सिल्लेगाव, औरंगाबाद ग्रा. गंगापुर, औरंगाबाद ग्रा. सिल्लेगाव, औरंगाबाद ग्रा. वेजापुर, औरंगाबाद ग्रा. पुर्णा पो.स्टे. जि. परभणी 143, 147, 148, 149, 323,504,506 भादवि 394 भादवि 399,402 भादवि कारवाई केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post