राष्ट्रवादी काँग्रेसची घरोघरी सभासद नोंदणी ..

शहर जिल्हा अध्यक्ष खाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली 


प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद : (अब्दुल कय्यूम ) : 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभासद नोंदणी सध्या सुरू आहे महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने काम सुरू केल्याचे चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद पूर्व विधानसभे तर्फे घरोघरी जाऊन सभासद नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे .

शरद पवार साहेबांचे विचार घरोघरी पोहोचविण्याच्या उद्देशाने आणि पक्ष वाढीसाठी नोंदणी सुरू केली जात असल्याचे औरंगाबाद पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष जावेद खान यांनी सांगितले शहरातील वार्ड क्रमांक 112 शाही नगर भारत नगर येथे घरोघरी जाऊन राष्ट्रवादीची सभासद नोंदणी करण्यात आली औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष खाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या नेतृत्वामध्ये ही सभासद नोंदणी केली जात असून शहरातील विविध वार्डामध्ये सभासद नोंदणी दरम्यान नागरिकांच्या समस्या देखील आम्ही जाणून घेत असल्याचे खाजा शरफोद्दीन मुल्ला म्हणाले वार्डातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन निश्चितच होत त्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील राहील असेही ते म्हणाले याप्रसंगी प्रसिद्धी प्रमुख शेख कलीम, सय्यद युसुफ ,फिरोज खान, रफिक पटेल, साजिद खान, विखार पटेल, फैय्याज खान, शेख मोहसीन, सय्यद जावेद, साजिद पटेल, राजू पठाण, शगीर शेख, डॉक्टर कदीर पटेल, गफार पठाण आदींची उपस्थिती होती याप्रसंगी सत्तार पिंजारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post