प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी मानवतावादी मार्ग दाखवला - हजरत मौलाना इरफान कासमी

 जमीयतूल उलमाए हिंदच्या वतीने  औरंगाबाद येथून सुरुवात


प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद,(अब्दुल कय्यूम ) :

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जगाला मानवतावादी, समान न्याय, शांती व सदभावनेचा मार्ग दाखवला. समाजाने त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जीवन व्यतीत केले तर वाईट प्रवृत्ती, वाईट सवईपासून दुर राहुन एका ईश्वराची भक्ती केल्यास यश नक्की मिळेल. समाजात वाढणारा नशा, गुन्हेगारी, लग्नात अतोनात खर्च यावर प्रतिबंध लावण्यासाठी समाजाने पुढे यावे, वेळोवेळी सन्मार्ग दाखवण्यासाठी इश्वराने प्रेषीत पाठवून मार्ग दाखवला, जो वाईट मार्गाने जाईल त्याचे काय परिणाम होतात याबाबत मार्गदर्शन देवबंद दारुल उलूमचे हजरत मौलाना इरफान कासमी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.

किराडपुरा येथे शनिवारी सायंकाळी जमीयतूल हिंदच्या वतीने समाजात सुधारणा आणण्यासाठी भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमीयतूल उलमाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी उपस्थित होते. यावेळी विविध धर्मगुरुंनी बयान करत आपले विचार व्यक्त केले. 

कार्यक्रमाची सुरुवात कारी अन्सार इशाअती यांनी कुरआन पठनाने झाली. कारी मिनहाज व अजीज इमामोद्दीन यांनी नात ए पाक पठन केली. प्रस्तावना मुफ्ती नईम नदवी यांनी केली. मौलाना अब्दुल शकुर जामई, मौलाना मोईजोद्दीन फारुकी, मुफ्ती अब्दुल रज्जाक मिल्ली, मुफ्ती हजरत रहेमान, हजरत मौलाना अब्दुल कदीर मदनी, हजरत मुफ्ती मोईजोद्दीन कासमी यांनी व्यासपीठावर आपले विचार व्यक्त केले. सुत्रसंचालन मुफ्ती अब्दुल गफ्फार यांनी केले.  महाराष्ट्र अध्यक्ष हाफिज नदीम यांनी सांगितले जमीयतूल उलमाए हिंद 1990 पासून देशात काम करत आहे. सिरत्तून्नबी व समाजातील वेळोवेळी येणारे बिघाड व नशा मुक्तीसाठी दरवर्षी कार्यक्रम घेतले जातात. समाजात वाईट सवईपासून सुटका करण्यासाठी हि चळवळ तीव्र करण्यासाठी 22 ऑक्टोबर पासून औरंगाबाद येथून मोहिम सुरु केली. 1 नोव्हेंबर पर्यंत मराठवाड्यात हे कार्यक्रम घेतले जातील. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र व शेवटी मुंबई येथे कार्यक्रम घेतले जातील. समाजाने या कार्यक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. हाफिज नदीम यांनी दुवा केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. आभार मुफ्ती नदीम इशाअती यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारी अफरोज, मौलाना अब्दुल सत्तार, मौलाना अब्दुल गफ्फार, मौलाना मुस्तकीम, मौलाना नईम कासमी, मौलाना असरार, मौलाना इशा इशाअती, नुरुल हामिद, अन्वर शेख यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post