रिक्षा भाडेदर पत्रक (टेरिफ कार्ड) वापरू देण्याची मागणी राज्य परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : शहरात नुकतीच रिक्षा भाडेवाढ लागू झाली आहे. पण, यासाठी संबंधित रिक्षाने मीटर प्रमाणीकरण केले पाहिजे, ही पूर्वअट प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घातली होती.त्यामुळे अनेक रिक्षा संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेत रिक्षा भाडेदर पत्रक (टेरिफ कार्ड) वापरू देण्याची मागणी राज्य परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात रिक्षाभाडे दर दि. 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात आले आहेत. यानंतर मीटर प्रमाणीकरण करण्याची व्यवस्था मर्यादित असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे. त्यामुळे रिक्षा भाडेदर पत्रक म्हणजे टेरिफ कार्ड वापरण्यास परवानगी देण्याची किंवा नवीन तंत्रज्ञानाने सज्ज अशा ऍपचा वापर करण्यास परवानगी देण्याची मागणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे केली होती. यावर प्रादेशिक परिवहन विभागाने कोणताही निर्णय न घेतल्याने संघटनांनी रिक्षा चालकांच्या विविध प्रश्‍नी मुंबई येथे झालेल्या परिवहन आयुक्तांबरोबरील बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. यावर परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी लवकरच निर्णय घेऊ असे आश्‍वासन दिल्याचे कळते आहे. 

यावेळी सहपरिवहनआयुक्त जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, रिक्षा पंचायत पतसंस्थेचे उपाध्यक्ष आनंद बेलमकर, रिक्षा पंचायत संघटनेचे पदाधिकारी सिद्धार्थ चव्हाण उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post