टाकळीवाडी गावामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी माजी सुभेदार केंदबा कांबळे यांची बिनविरोध निवडप्रेस मीडिया लाईव्ह :

टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील माजी सुभेदार केंदबा कांबळे हे भारतीय लष्करात 26 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत .त्यांची दिनांक 15/09/2022 रोजी महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. देश सेवेबरोबर मला आता इथून पुढे समाजसेवा करायचा त्यांचा ध्यास आहे. ते बोलताना म्हणाले मला इथून पुढे निस्वार्थपणे व प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

  निवड करतेवेळी कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे अमित पाटील साहेब ,ग्राम पोलीस पाटील सौ सुनीता पाटील, सरपंच मंगल बिरणगे, उपसरपंच बाजीराव गोरे, ग्रामसेवक एन .एच.मुल्ला, अनिल कांबळे, विनायक कांबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,समस्त गावकरी उपस्थित होते. ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.टाकळीवाडी गावांमध्ये यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टाकळीवाडी  : नामदेव निर्मळे

Post a Comment

Previous Post Next Post