आज 5 सप्टेंबर, शिक्षक दिन ! डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल थोडक्यात माहिती.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

ज 5 सप्टेंबर, शिक्षक दिन !  देशातील शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या कार्याची दखल घेऊन आज त्यांचा गौरव केला जातो. खरं तर शिक्षक दिन म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती.

5 सप्टेंबर 1888 रोजी जन्मलेले डॉ. राधाकृष्णन  हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. डॉ. राधाकृष्णन हे शिक्षक, तत्त्वज्ञ आणि विद्वान म्हणून उल्लेखनीय कार्यासाठी ओळखले जातात. शिक्षक दिन 2022 च्या निमित्ताने भारताचे राष्ट्रपती शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतील. देशातील काही उत्कृष्ट शिक्षकांचा त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल गौरव करणे, ज्यांनी आपल्या बांधिलकीतून शालेय शिक्षणाचा दर्जा तर सुधारलाच, शिवाय विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले, हा शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराचा उद्देश आहे.

1962 पासून, डॉ. राधाकृष्णन यांच्या शिक्षण आणि विद्यार्थ्यांबद्दलच्या उल्लेखनीय दृष्टिकोनाचा गौरव करण्यासाठी 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊयात…

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. त्यांचा जन्म तामिळनाडूच्या तिरुत्तनी शहरात तेलगू कुटुंबात झाला. ते अभ्यासात हुशार होते आणि त्यांना अनेक शिष्यवृत्त्या मिळाल्या. तिरुपतीच्या एका शाळेत शिक्षण घेऊन नंतर वेल्लोर येथे स्थायिक झाले.

डॉ. राधाकृष्णन यांनी ख्रिश्चन कॉलेज, मद्रास मध्ये तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. ते भारताच्या इतिहासातील आतापर्यंतच्या महान फिलॉसफर्सपैकी एक मानले जातात.

पदवी पूर्ण केल्यानंतर डॉ. राधाकृष्णन मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. काही दिवसानंतर म्हैसूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवायला सुरुवात केली.

डॉ. राधाकृष्णन हे 1952 ते 1962 या काळात भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. 1962 ते 1967 या काळात ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.

1949 ते 1952 या काळात ते सोव्हिएत युनियनमधील भारताचे राजदूतही होते. डॉ. राधाकृष्णन यांनी 1939 ते 1948 या काळात बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू म्हणूनही काम पाहिले.

1984 मध्ये डॉ. राधाकृष्णन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

.

Post a Comment

Previous Post Next Post