शिवशाही बस-कंटेरचा भीषण अपघातत एक जण ठार , सहा जखमी

 प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  उरुळी देवाची हद्दीतील सासवड  येथे रविवारी मध्यरात्री एका कंटेनर आणि शिवशाही बस मध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघाता मध्ये एक जण ठार झाला अन पाच ते सहा जण जखमी झाले आहेत.

मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एका प्रवाशाचा जागच्या जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. तर पाच ते सहा प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असल्याची माहिती मिळतेय. सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमका कसा झाला अपघात?

पुणे सासवड रोड वर उरुळी देवाची फाट्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली. उरुळी देवाची फाट्याजवळ असलेल्या एका गोडाऊनमधून कंटेनर निघाला होता. तो सासवड रस्त्यावर येत होता. नेमक्या याच वेळी पुण्याच्या दिशेने येत असलेल्या एका शिवशाही बसच्या चालकाला वेग नियंत्रित करता आला नाही. अखेर रस्त्यावर आडव्या दिशेत असलेल्या कंटेनरला भरधाव शिवशाही बसने जोरदार धडक दिली.पंढरपूरहून प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेनं जात असताना शिवशाही बसचा अपघात झाला. भरधाव शिवशाही बसची ही धडक इतकी भीषण होती, की चालकासह प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. यात कंटनेरचंही नुकसान झालं, तर शिवशाही एसटी बसलाही फटका बसला. शिवशाही बस आणि कंटेनरच्या या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्य करण्यात आलं.

Post a Comment

Previous Post Next Post