रेशनिंग तांदुळ छुप्या पद्धतीने विकणाऱ्यांवर कारवाईची मागणी

 लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


पुणे : सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे रेशनिंगचा तांदुळ छुप्या पध्दतीने बेकायदेशीररित्या खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्यावर  व्यक्तींवर मोका कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर - जिल्हा अध्यक्ष   संजय आल्हाट आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आज या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

कोरोनाच्या काळात गरीबांना  मोफत धान्य उपलब्ध करून देण्याचे मोलाचे काम केंद्र व महाराष्ट्र शासनाने केले आहे.  काही समाज कंटकांनी   पैशासाठी हे धान्य छुप्या पध्दतीने विकले. मागील आठवड्यात संगमवाडी येथील एका गोडाऊनवर छापा टाकुन केलेल्या कारवाईत हा काळा बाजार उघडकीस आला आहे. हा काळाबाजार करणारे  संतोषकुमार जयहिंद मोरे, प्रेमचंद्र जैन,  श्रीमती संतोषी रूपचंद सोळंकी, प्रकाश रूपचंद सोळंकी,  प्रमोद रूपचंद सोळंकी,  संबंधीत परिमंडळाचे अधिकारी  यांच्यावर मोका कायदया अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाने केली आहे.अन्यथा  पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी शरद टेमगीरे (पुणे शहर-जिल्हा कार्याध्यक्ष ),सचिन अहिरे (पुणे शहर- जिल्हा महासचिव ),अशोक काशिद,के.सी. पवार (पुणे शहर सरचिटणीस ), तुषार ननावरे  उपस्थित होते.
Post a Comment

Previous Post Next Post