भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावणाऱ्या नामांकित बुकीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेप्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : भारत  पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावणाऱ्या नामांकित बुकीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डी मोरा पबमध्ये हा सट्टा लावण्यात आला होता.तेथून लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय मोबाईल, सट्टा लावण्यासाठी आवश्यक साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. अशी अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

अमिताभ गुप्ता म्हणाले,काल एशिया कप स्पर्धेतील सुपर 4 मध्ये दुसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला. या सामन्याच्या वेळी पुणे शहराच्या मध्यवस्तीतील डी-मोरा पबमध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने रात्री उशिरा पबमध्ये छापा टाकून श्रीपाद यादव नामक बुकीला ताब्यात घेतले. तो पबमध्ये दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यावर बुकिंग घेऊन सट्टा घेत असल्याचे उघडकीस आले. यावेळी पोलिसांनी लाखो रुपयांची रोकड, मोबाईल, साहित्य जप्त केले आहे.

अमिताभ गुप्ता म्हणाले,श्रीपाद यादव हा यापूर्वी पिंपरी चिंचवडमधून बेटिंगचा धंदा करत होता. गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आयपीएलवर बेटिंग घेत असताना त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याने आपला कारभार पुण्यात हलविला होता.

Post a Comment

Previous Post Next Post