पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातल्याची घटना पुण्यातील लोहगाव भागात घडली

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : रस्त्यात लावलेली गाडी बाजूला घेण्यावरुन झालेल्या वादात पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातल्याची घटना पुण्यातील लोहगाव भागात घडली आहे. पोलीस नाईक पी. आर. मोटे यांच्यावर हा हल्ला  करण्यात आला असून कालीदास खांदवे (वय ३५, लोहगाव), माऊली खांदवे (लोहगाव) आणि त्यांच्या तीन साथीदारांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

पोलीस कर्मचारी मोटे हे त्यांच्या कारमधून लोहगाव भागात असणाऱ्या एका दुकानात गेले. त्यावेळी त्यांनी गाडी दुकानासमोर उभी केली होती. त्याठिकाणी कालीदास खांदवे याने त्यांना गाडी बाजूला घ्या, असे सांगितले. त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर खांदवे याने फोन करुन साथीदारांना बोलावले आणि मोटे यांच्यावर हल्ला केला

Post a Comment

Previous Post Next Post