पुणे : “आय लव्ह’चे बोर्ड तीन दिवसात काढण्याचा आयुक्तांचा आदेश .



प्रेस मीडिया लाईव्ह :

मौलाना सादिक मजाहिरी :

पुणे : महानगरपालिकेची मान्यता न घेताच पालिकेच्या पथदिव्यांच्या खांबातून चोरून वीजजोड घेऊन शहरात 73 ठिकाणी “आय लव्ह’चे बोर्ड लावण्यात आले असल्याचे समोर आले आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर अतिक्रमण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आल्यानंतर तीन दिवसांत हे फलक काढण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आकाशचिन्ह आणि परवाना विभागास दिले.

शहरात तत्कालीन नगरसेवकांनी महापालिकेच्या निधीतून मोठ्या प्रमाणात “आय लव्ह’चे बोर्ड लावले आहेत. मात्र, त्या सोबतच अनेकांनी निवडणुकांच्या तयारीसाठी  म्हणून स्वत:च्या खर्चातून महापालिकेची कोणतीही मान्यता न घेता असे फलक लावले आहेत. त्यात काही नगरसेवकांचा तसेच राजकीय कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. हे बोर्ड लावताना पादचारी मार्ग, रस्ते यावर लावण्यात आले. त्यासाठी पथ विभागाला, विद्युत विभागाला कोणतीही माहिती न देता परस्पर बोर्ड लावण्यात आले. त्यामुळे पादचाऱ्यांना तसेच वाहन चालकांनाही या फलकाचा अडथळा होत असून, अनेक भागात अतिक्रमण करून हे फलक लावण्यात आलेले आहेत. याबाबत महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर पालिका आयुक्तांनी तत्काळ हे फलक हटविण्याचे आदेश जुलै महिन्यातच दिले होते. मात्र, माननियांच्या दबावापोटी आकाशचिन्ह विभागाकडून ही कारवाई केली जात नसल्याने अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी पुन्हा याबाबत प्रशासनास आदेश दिले. मात्र, त्यानंतरही कारवाई न करता केवळ अनधिकृत फलकांचे सर्वेक्षण करून त्याचा आकडा समोर ठेवण्यात आला आहे. क्षेत्रीय कार्यालयांकडून विद्युतचे कर्मचारी नाही. ही संयुक्त कारवाई असल्याने होणार आहे असे सांगितले. मात्र, बोर्ड लावताना विद्युत विभागाची गरज क्षेत्रीय कार्यालयांना पडलेली नव्हती, त्यांना अंधारात ठेवूनच बोर्ड लावले. पण आता कारवाई टाळण्यासाठी विविध कारणे दिली जात आहेत.

आकाशचिन्ह, विद्युत विभागाची परवानगी न घेता उभारलेले “आय लव्ह’चे बोर्ड काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तीन दिवसांत हे सर्व बोर्ड काढून टाकल्याचा अहवाल सादर केला जाईल. जे अधिकारी कारवाई करणार नाहीत, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
– विक्रम कुमार,महापालिका आयुक्त

क्षेत्रीय कार्यालयनिहाय बोर्डची संख्या

Post a Comment

Previous Post Next Post