दि मुस्लिम को बँकेची 90 वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न झाली.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : येथील दी मुस्लिम को ऑप  बँकेची 90 वी वार्षिक सर्व साधारण सभा आजम कॅम्पस असेम्ब्ली हॉल येथे पार पडली.कोविड च्या काळात सुद्धा मुस्लिम बँकेचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवण्यात आले , व त्याबद्दल  मीटिंगला  आलेल्या  सभासदांनी  समाधान व्यक्त केले.  या वेळी बँकेचे व्हॉईस चेअरमन एस ए इनामदार , वरिष्ठ संचालक एड अय्युब शेख , लुकमान खान , मुन्नवर शेख , तस्लिम खान , (पुढारी ) , अल्ताफ सय्यद , दानिश तडवी , मोहम्मद  गौस (बबलू सय्यद ) सईद सय्यद , अफजल खान , इकबाल शेख , समीर शेख , जाखिर खलिफा , अंजुम मणियार , आयेशा तांबोळी , तज्ञ संचालक  ॲड जफर खान व मोहम्मद सादिक लुकडे , मुस्लिम बँकेचे सी ई ओ मोहम्मद शाहिद , आडमिन ऑफिसर रफिक शेख , मॅनेजर अहमद शेख , अजीम शेख ,  सईद मुल्ला व सर्व  शाखेनचे मॅनेजर व स्टाफ उपस्थित होते.

डॉ.पी ए इनामदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पुणे :  डॉ. पी ए इनामदार यांचा विशेष सत्कार  मुस्लिम बँकेचे संचालक मंडळ, व सभासदांच्या वतीने आझम कॅम्पस  डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटी झाल्याबद्दल  करण्यात आला.


सत्काराला उत्तर देताना डॉ.  पी ए इनामदार म्हणाले की , हे सर्व श्रम माझ्या एकट्याचेच नसून आपण सर्वांनी गेल्या पस्तीस ते चाळीस  वर्ष जी साथ दिली आहे त्या मुळेच आपण यशस्वी झालो आहोत तसे या पुढेही अशीच साथ आपल्या सर्वांची सदैव राहील असा मला ठाम विश्वास आहे. कार्येक्रम संपल्यानंतर एड.अय्युब शेख यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.


Post a Comment

Previous Post Next Post