डॉ. तुषार निकाळजे यांच्या पुस्तकाची नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास निवड.......




प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे: डॉ.तुषार निकाळजे यांनी लिहिलेल्या "भारतीय निवडणूक प्रणाली- स्थित्यंतरे व आव्हाने"  या पुस्तकाचा समावेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर या विद्यापीठाच्या एम. ए.(राज्यशास्त्र) वर्षाच्या १) भारतीय निवडणूक व्यवस्थापन २) भारतीय शासन व राजकारण ३)  सेफॉलॉजी या तीन विषयांच्या अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून निवड झाली आहे.

हे पुस्तक यापूर्वी १) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड २) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव३) मुंबई विद्यापीठ४) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे ५) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे ६) अबेदा इनामदार स्वायत्त महिला महाविद्यालय पुणे यांच्या बी.ए व एम. ए. (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून संबंधित अभ्यास मंडळांमार्फत मान्यता मिळाली आहे. तसेच या पुस्तकाची नोंद वर्ष २०१९ मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील झालेली आहे.

डॉ. तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे शिक्षकेतर- कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. भारतीय निवडणूक प्रणाली हे पुस्तक हरिती प्रकाशन, पुणे यांनी वर्ष २०१६ मध्ये प्रकाशित केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post