राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पुणे महापालिकेचे  विभाजन होणार का अशी चर्चा सध्या पुण्यात रंगते आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले की, पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद कशाला काढता. जेव्हा करायचा आहे तेव्हा बघू. राज्य सरकार पुढे आज तरी कुठलाही प्रस्ताव नाही.'भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो मात्र आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. 

आपल्याला विकासाकडे जायचं आहे.'मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही,  पुण्याची लोकसभा ही लढवणार नाही. तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का? या फक्त माध्यमातील चर्चा आहे. मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असता, मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल. असे ही त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या मंत्र्यांची मंत्री मंडळात वर्णी लागणार का? असा प्रश्न विचारल्यावर फडणवीस यांनी या बाबत बोलणं टाळलं.काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेच्या विभाजनाबद्दल विधान केलं होतं. पुणे महापालिकेचे 2 भाग करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post