आयुक्तांच्या या आदेशामुळे मात्र, संबंधित कंत्राटदाराचे चांगलेच धाबे दणाणले .प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रतिनिधी :

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह  यांनी आता  प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन विभागात काय कामकाज सुरू आहे. तसेच त्यांनी नवीन काय करता येईल, याच्याही सूचना दिल्या आहेत. विभागाचा आढावा घेत असताना आयुक्त सिंह यांना विशेष करून स्थापत्य विभागाची कामे घेण्यासाठी काही कंत्राटदार तब्बल 30 ते 40 टक्के कमी दराने निविदा भरून काम मिळवत असल्याचे त्यांच्या निदर्शास आले. 

याबाबत संबंधित विभागाच्या प्रमुखांनाही त्यांनी याची चौकशी केली. विभाग प्रमुख कंत्राटदारांना काम परवडत असेल म्हणून घेत असतील, असे सांगितल्याची महापालिका वतुर्ळात चर्चा आहे. मात्र, एवढ्या कमी दराने काम घेऊन त्या कामाचा दर्जा, गुणवत्ता खरेच चांगली राहिल का? याची आयुक्त सिंह यांना खात्री वाटत नाही. त्यामुळे सिंह यांनी गेल्या वर्षभरात 30 ते 40 टक्के कमी दराने निविदा भरून काम मिळवणाऱ्या 8 ते 10 कंत्राटदाराच्या कामाचा दर्जा तपासा, त्या कामाची सर्व माहिती घ्या, असा आदेश दक्षता समितीला दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. आयुक्तांच्या या आदेशामुळे मात्र, संबंधित कंत्राटदाराचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post