पनवेल येथील कोळीवाडा विसर्जन घाटावर सायंकाळी साडेसात वाजता जनरेटरसाठी जोडणी घेतलेली विजेची तार गणेशभक्तांच्या अंगावर पडल्याने तब्बल ११ गणेशभक्तांना विजेचा शाॅक लागलाप्रेस मीडिया लाईव्ह :

सुनील पाटील :

 देशभरामध्ये आज गणेशोत्सवाची सांगता होत आहे. करोना लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करता आल्या नसल्याने यंदा सर्वत्र मोठं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. ठिकठिकाणी गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. अशातच पनवेल शहरामध्ये गणेश विसर्जन घाटावर दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. पनवेल येथील कोळीवाडा विसर्जन घाटावर सायंकाळी साडेसात वाजता जनरेटरसाठी जोडणी घेतलेली विजेची तार गणेशभक्तांच्या अंगावर पडल्याने तब्बल ११ गणेशभक्तांना विजेचा शाॅक लागला आहे.

प्राप्त माहितीनुसार, या दुर्घटनेत विजेचा शॉक बसलेल्या ३२ वर्षीय हर्षद पनवेलकर व १७ वर्षीय मानस कुंभार यांना लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मानस यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सूरु आहेत. तर उपजिल्हा रुग्णालयात पाच वर्षीय निहाल चोनकर, १५ वर्षीय सर्वेश पनवेलकर, ६५ वर्षीय दिलीप पनवेलकर, २४ वर्षीय दिपाली पनवेलकर, १८ वर्षीय वेदांत कुंभार, ३६ वर्षीय दर्शना शिवशिवकर तर जखमींमध्ये ९ महिन्याचे तनिष्का पनवेलकर या बाळाला स्वतः पोलीस उपायुक्त पाटील व विजय कादबाने यांच्या पथकाने रुग्णालयात दाखल केले.

 

Post a Comment

Previous Post Next Post