शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळाली

दसरा मेळाव्याच्या शिवसेनेच्या मागणीला हस्तक्षेप करणारी शिंदे गटाची याचिका हाय कोर्टाने फेटाळली 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई – शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यासाठी परवानगी दिली आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या शिवसेनेच्या मागणीला हस्तक्षेप करणारी शिंदे गटाची याचिका हाय कोर्टाने फेटाळली आहे. आमदार सदा सरवणकर यांनी ही याचिका दाखल केली होती. शिवसेना, शिंदे गट आणि  मुंबई पालिकेचा आज कोर्टात युक्तीवाद झाला. अखेरीस उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी (ठाकरे गट आणि शिंदे गट) महापालिकेकडे अर्ज केला होता. दोघांनाही मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली होती. त्यानंतर हा वाद उच्च न्यायलायत गेला होता. अखेर आज न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. परवानगी मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये जल्लोष करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post