स्व. सहकार महर्षि गुलाबराव पाटील यांची 101 वी जयंती गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात उत्साहात साजरीप्रेस मीडिया लाईव्ह :

 मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर (शिंदे) :

स्व. सहकार महर्षि गुलाबराव पाटील यांची 101 वी जयंती गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात उत्साहात साजरी व केंब्रीज स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन स्व. सहकार महर्षि गुलाबराव पाटील यांची 101 वी जयंती गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, मिरज येथे उत्साहात साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंबिज स्कूलच्या प्राचार्या श्रीदेवी कुल्लोळी यांनी केले. यावेळी बी. एड्. चे प्राध्यापक गोपाळ कबनुरकर म्हणाले की, स्व. गुलाबराव पाटील यांच्या कारकिर्दीत जे त्यांनी काम केले ते काम सुवर्ण अक्षराने लिहावे असेच आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी डीसीसी बँकेची उभारणी करून बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्याची व्यवस्था केली. या देशातला शेतकरी वाचला तर देश वाचेल अशी भावना त्यांची होती म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सामान्य लोक स्वावलंबी व्हावे यासाठी जे कार्य केले ते समाजासाठी आदर्श आहे.  यानंतर प्राचार्य, डॉ. राजेंद्र मेथे यांनी गुलाबराव पाटील यांच्या जीवनाविषयी व सहकाराविषयी प्रबोधन केले. प्राचार्य, बिभीषण कराळे आपले आभार व्यक्त करताना म्हणाले की, सहकार क्षेत्रामध्ये गुलाबराव साहेबांनी जे कार्य केले गेले ते आज पर्यंत कोणीही केलेले नाही.

यावेळी संस्थेचे कॅम्पस कोऑडीनेटर सतिश पाटील, शाळा अधिक्षिका ख्रिस्टीना मार्टीन, अभयकुमार गायकवाड, विनय डोंगरे, प्रशासकीय अधिकारी विलास शेवाळे संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षककेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते. 

तसेच संस्थेच्या संयोगिता पाटील केंब्रीज स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये स्व. गुलाबराव पाटील यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन फेडरल बँक संलग्न आयोजित करण्यात आले होते प्रारंभी स्व. गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इम्तियाज पटेल म्हणाले की, गुलाबराव पाटील साहेब हे स्पष्ट वक्ते आणि निर्भही होते. युक्तिवाद मांडण्याची त्यांची खास शैली होती या गुणांमुळेच त्यांनी एक प्रतिष्ठित वकील म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. इंदिरा गांधींनी त्यांची राज्यसभेवर निवड केली शेतकऱ्यांचे प्रश्न राज्यसभेत मांडले त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामान्य जनता शेतकरी आणि समाजातील सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांच्या भल्यासाठी वाहून घेतले. 

यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक म्हणून श्री. दरूरे व लॉरेन्स अलमेडा यांनी परीक्षण केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक आसावरी बेडेकर, द्वितीय क्रमांक उरवी कोष्टी, तृतीय क्रमांक अनुराधा भोसले व उत्तेजनार्थ ओम कनवाडे आणि उमर पाटील यांनी यश संपादन केले व बक्षीस पटकावले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कुंभार व आभार अरिफा भोकरे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post