कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.), पेठ वडगांवचा ३६ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा”प्रेस मीडिया लाईव्ह :

   आज गुरुवार दिनांक १५/०९/२०२२रोजी, श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचालित, "कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड.), पेठ वडगांवचा “३६ वा वर्धापनदिनाचा सोहळा” मोठ्या उत्साहाने कॉलेज मध्ये साजरा करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये "सत्यनारायण पुजा व स्नेह भोजनाचे” आयोजन केले होते.

       या कार्यक्रमास कॉलेजचे अध्यक्ष मा. श्री विजयसिंह माने, संचालक बाबासो मुळीक, संचालक बाळासाहेब घोटणे, सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर व प्रिन्सिपल श्री सरदार जाधव  ,हेमंत प्रितेश शहा माध्यमिक विद्यालय च्या मुख्याध्यापिका रेश्मा गुरव, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे सर्व शाखांचे प्राचार्य,  डॉ धनराज जडगे  ,डॉ सचिन पाटील ,डॉ अभिजीत कुलकर्णी, डॉ निलेश चौगुले ,डॉ. कोंडेकर, आर .आर. पाटील., प्रियंका पाटील, प्रा निगार मुजावर लोकमतचे पत्रकार आयुब मुल्ला ,दैनिक तरुण भारतचे पत्रकार नंदकुमार साळुंखे यांची उपस्थिती होती कॉलेजच्या प्राचार्या सौ. निर्मळे.आर.एल, प्राध्यापक छात्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

 ३६ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने महाविद्यालयामार्फत सर्वांना एक रोपटे (वृक्ष) भेट म्हणून देण्यात आले. सर्वांनी महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अशा रीतीने कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड.) पेठ वडगांव येथे सर्व अतिथीच्या उपस्थितीने  वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post