सौ स्वाती माजगावे यांची पॅंथर आर्मी महिला आघाडी जिल्हा अध्यक्षपदी निवड.प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर  : इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ स्वाती माजगावे यांची पॅंथर आर्मी स्वराज संविधान रक्षक सेना कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

पॅंथर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतनभाई इंगळे यांनी निवडीचे पत्र दिले . पँथर आर्मी च्या माध्येमातून दलित, शोषित, पीडित, बौद्ध, आदिवासी, मुस्लिम, बहुजन वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढत राहावे, देशात अस्तित्वात असलेल्या मनुवादी, जातीवादी वेवस्थे विरोधात संविधान वाचवण्याचा लढा तीव्र करा, जणमाणसाच्या  मूलभूत प्रश्न आणि हक्कासाठी आंदोलन आणि आक्रमक पवित्रा घेऊन जण माणसाचे आंदोलन उभे करा, दलित, शोषित, पीडित, वंचित, अत्याचार ही राष्ट्रीय आपत्ती आहे, दलित, पीडित अत्याचार सारख्या घटना घडत आहेत, त्या विरोधात उभे राहा, आवाज उचला, जातीचा, विषमता, करोना  पेक्षा घातक रोग आहे, हा रोग नष्ट करण्यासाठी प्रेत्न करा, शेहर, गाव, तालुका, जिल्हा  पातळीवर संघटना मजबूत करा, गाव तिथे  पँथर आर्मी संगठना बांधणी करा, आणि लढा आणखी आक्रमक कराल, आपल्याला दिलेल्या पदाला जबाबदारी पूर्वक पार पाडाल, आणि जबाबदारी ला न्याय  द्याल, असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे या निवडी करिता महेश कचरे (राष्ट्रीय सरचिटणीस ) संतोष आठवले  (राष्ट्रीय मुख्य  महासचिव ) चंद्रकांत मुळे ,महाराष्ट्र  राज्य अध्यक्ष मनोज शिंदे. (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ),कैलाश वानखेडे 

(महाराष्ट्र राज्य महासचिव ), राजेश कांबळे (महाराष्ट्र कार्य अध्यक्ष ) ,पृथ्वीराज नेटकर (महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष ) ,राणीताई पल्ला(महिला आघाडी सरचिटणीस ) फिरोज मुजावर (कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष )यांचे विशेष सहकार्य लाभले

Post a Comment

Previous Post Next Post