कोल्हापूर मध्ये शिंदे गटाला धक्का

कोल्हापूरचे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे  शिंदे गटातून बाहेर 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये शिंदे गटाला धक्का बसला आहे.कोल्हापूरचे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे  यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. अवघ्या 15 दिवसांमध्येच फराकटे शिंदे गटातून परतले आहेत. आपण मालोरीराजे आणि सतेज पाटील यांच्यासोबतच राहणार असल्याचं दिगंबर फराकटे यांनी स्पष्ट केलं आहे. फराकटे यांनी पत्रक काढत शिंदे गटातून बाहेर पडत असल्याचं सांगितलं.


राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये 15 दिवसांपूर्वी दिगंबर फराकटे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेचे 40 आणि अपक्ष 10 असे एकूण 50 आमदार त्यांच्यासोबत गेले, त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे 19 पैकी 13 खासदारही शिंदे गटात सामील झाले. आमदार-खासदारांनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना नेमकी उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेंची याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगापुढे होणार आहे. तसंच याप्रकरणाची सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post