टाकळी टाकळीवाडी कार्यक्षेत्रात लंपी आजारावरील लसीकरण जोमातप्रेस मीडिया लाईव्ह :

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे

  तालुका:- शिरोळ टाकळी  येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णू निर्मळे यांनी टाकळी व टाकळीवाडी कार्यक्षेत्रातील लंपी आजारावरील लसीकरण 70 टक्के पूर्ण करण्यात आले आहे.

   लसीकरण पूर्ण क्षमतेने उपलब्ध असल्यामुळे लसीकरण जोमात चालू आहे .टाकळी टाकळीवाडी कार्यक्षेत्रामध्ये 3500 जनावरे यांची संख्या आहे. पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. आनंदाची गोष्ट की कार्यक्षेत्रात कोठेही मरतूक आढळून आलेली नाही .दोन दिवसात लसीकरण शंभर टक्के पूर्ण होईल.

   लंपी सदृश्य जनावर आढळल्यास डॉक्टर पशुवैद्यकीय दवाखान्याची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.पशुपालकांचा लसीकरणासाठी मोलाच सहकार्य लाभत आहे .विष्णू निर्मळे पूर्ण क्षमतेने आपली सेवा बजावत आहेत.काही अडचण आल्यास त्वरित संपर्क करावे.

Post a Comment

Previous Post Next Post