सैनिक टाकळीची कन्या चक्क रशियात झळकली... प्रेस मीडिया लाईव्ह :

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे

    सैनिक टाकळी. तालुका:- शिरोळ येथील डॉ. वैजंता विजय पाटील ह्या भारत रशिया या राष्ट्रामधील राजनैतिक संबंधाची 75 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त मॉस्को युनिव्हर्सिटी मॉस्को रशिया येथे दिनांक 14.09.2022 रोजी आंतरराष्ट्रीय परिषद व पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ,समग्र अण्णाभाऊ साठे या विषयावर शोध निबंध सादर करताना डॉक्टर वैजंता विजय पाटील यांनी मोठे निबंध वाचन केले.

     त्यांचे रशियामध्ये कौतुक झाले. खेडेगावातील सैनिक टाकळी परंपरेचे गाव असलेली मुलगी आज रशिया देशामध्ये झळकली याचा गावकऱ्यांना अभिमान वाटत आहे.तसेच सैनिक टाकळी गावामध्ये  त्यांचे कौतुक करण्यात आले .

Post a Comment

Previous Post Next Post