गणेश विसर्जन पुर्वी निदान रस्त्याचे खड्डे तरी भरावेतप्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील

कर्जत तालक्यातील देऊळवाडी, बोरवाडी आणि पुलाची वाडी गावचे गौरि गणपति देऊळवाडी रेल्वेच्या फटकातून ग्रामीण मार्ग क्रमांक १६२ मार्गे  माळवाडी गावाच्या कडेला असलेल्या उल्हास नदी च्या पात्रात गौरी व गणेश विसर्जन करत असतात.

 मात्र या रस्त्यावर पडलेले खड्ड्यातून जाण्या ऐवजीं ग्रामस्थांनी चार फाटा मार्गे आपली वाहने नाईलाजास्तव न्यावी लागतात. खरं तरं ही गाव तालुक्यांच्या माजी आमदारांची सासुरवाडी असुन देखिल नेहमीच दुर्लक्षित आणि अपेक्षितच राहीलेली आहेत. विद्यमान आमदारांचे कार्यकर्ते देखील ग्रामस्थांची ही समस्या गांभीर्याने घेतं नाहीत. हा रस्ता काँक्रिट चा झाल्यास चार फाट्यावर होणारी वाहतूक कोंडी तरं कमी होईलच पण या गावांतील शाळकरी विद्यार्थी, चाकरमानी, व ग्रामस्थांचा अपघातानं पासुन संरक्षण होइल तसेच वेळ ही वाचेल. म्हणुन स्थानीक लोकप्रिनिधींनी व अधिकाऱ्यांनी निदान गौरि गणेश विसर्जनाच्या आधी या रस्त्या वरील खड्डे बुझवावे व पावसाळा संपल्यानंतर याचे काँक्रिटीकरण व्हावे आश मागणी आता जोर धरु लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post