पुण्यातील नदीपात्रातील भिडे पुलाजवळ 35 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीप्रेस मीडिया लाईव्ह :

सादिक मजहर मौलाना :

पुणे : पुण्यातील नदीपात्रात 35 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नदीपात्रातील भिडे पुलाजवळ  मृतदेह सापडला असून मृत व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या करण्याल आली. या घटनेमुळे डेक्कन परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुणे शहराची मध्यवस्ती असलेल्या भिडे पुलावर ही घटना घडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

मृतदेहाची ओळख पटली असून गणेश सुरेश कदम असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. ते शनिवार पेठ परिसरातील रहिवासी आहेत. आज सव्वा दोनच्या सुमारात ही घटना समोर आली. पोलिसांना मृतदेह सापडल्याची माहिती कळताच डेक्कन पोलिसांनी नदीपात्रात धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा केला. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

गणेश कदम यांच्या लॉंन्ड्रीचा व्यवसाय आहे. त्याचं शनिवार पेठेत लॉंड्रीचे दुकान आहे. रविवारी संध्याकाळी एक फोन आल्यानंतर गणेश घरातून बाहेर पडले. मात्र रात्रभर घरात परतलेच नाही. त्यानंतर शोधाशोध सुरु झाली मात्र त्यांचा मृतदेह नदी पात्रात सापडला. पूर्ववैमस्यातून हत्या केल्याची शंका व्यक्त केली आहे. हत्या करुन पुरावा नष्ट करण्यासाठी हा मृतदेह नदीपात्रात फेकून दिला असावा,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post